वाहन चालविण्याच्या पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी आरटीओ कार्यालय शनिवार, रविवारीही सुरु राहणार

 अकोला,दि.८(जिमाका)- वाहन चालविण्याच्या शिकाऊ अनुज्ञप्तीनंतर पक्क्या अनुज्ञप्तीसाठी  चाचणी देण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जादा असल्याने सप्टेंबर २०२१ अखेर शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय सुरु राहिल असे उप प्रादेशिक परिवहन अधिकरी यांनी कळविले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, कोरोना पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे शिकाऊ लायसन्सला देण्यात आलेली मुदतवाढ तसेच फेसलेस लायसन्सची करण्यात आलेली सुविधा यामुळे पक्क्या लायसन्सची चाचणी देणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ  झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने विशेषत: पक्क्या अनुज्ञप्तीसाठी वेळ मिळण्यास अडचणी येत आहेत. तेव्हा सर्व शिकाऊ अनुज्ञप्तीधारकांनी  शिकाऊ अनुज्ञप्तीची मर्यादा संपुष्टा येण्या अगोदर त्यांची पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी होणे अनिवार्य असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने माहे सप्टैंबर २०२१ अखेरपर्यंत पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीकरीता सुटीच्या दिवशी म्हणजेच शनिवार रविवार या दिवशी कार्यालय सुरु ठैवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.तरी अकोला जिल्ह्यातील सर्व शिकाऊ अनुज्ञप्तीधारकांनी वाहन परवाना चाचणीकरीता सुटीच्या दिवशी कार्यालय सुरु असल्याने पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीकरीता नोंदणी (Online Slot Booking) करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला यांच्यावतीने करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ