358 अहवाल, दोन पॉझिटीव्ह; सहा डिस्चार्ज


अकोला,दि.7(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 358 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 356 अहवाल निगेटीव्ह तर दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि. 6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57831(43229+14425+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी दोन  = एकूण पॉझिटीव्ह चार.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 315325 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 311725 फेरतपासणीचे  402  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3198 नमुने होते. आजपर्यंत एकूण 315325 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 272096 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दोन पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात दोंघाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन पुरुषांचा समावेश असून ते अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहे. तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.

सहा डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर होम आयसोलेशन येथील सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

15 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57831(43229+14425+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56680 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 15 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ