गुरांचा आठवडी बाजार अटीशर्तीसह सुरु; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश


अकोला,दि.3(जिमाका)-  जिल्ह्या शेतीची खरीप हंगामाची कामे सुरु झाली आहे. शेतकऱ्यांच्या  कामाची निकड लक्षात घेता गुरांचा आठवडी बाजार सुरु करणे आवश्यक असल्याने जिल्ह्याकार्यरत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी निश्चित केलेल्या दिवशी गुरांचा आठवडी बाजार अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

अटी व शर्ती :

           जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामिण स्तरावरील नियमित भ‍रविण्यात येणारा गुरांचा आठवडी बाजार हे त्यांच्या नेमूण दिलेल्या दिवशी नियमित भरतील, गुरांचे आठवडी बाजारामध्ये गर्दी होणार नाही यांचे नियोजन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी आपल्या स्तरावरून करावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी क्षेत्राकरीता संबंधीत मुख्याधिकारी, नगर परिषदनगर पालिका ग्रामीण क्षेत्राकरीता संबंधीत तहसिलदारग्रामपंचायत सचिव यांनी याबाबत सहकार्य करावे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात भरणाऱ्या गुरांचे आठवडी बाजाराचे नियोजन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी करुन त्यास महानगरपालिका आयुक्त यांच्या स्तरावरून सहकार्य करावे.  आठवडी गुरांचे बाजारामध्ये गर्दी होणार नाही याकरीता गर्दीचे विकेंद्रीकरण करावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांनी त्यांचे स्तरावरून कोविड-19 संदर्भातील अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करावी.

            गुरांच्या आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांना मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. गुरांचे आठवडी बाजारमधील सर्व बाजार घटकांनी व्यापार करतांना मास्क परिधान करणे अनिवार्य राहील. कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरांचे आठवडी बाजाराच्या ठिकाणी साफसफाई करून वेळ निर्जंतूकीकरण करण्यात यावे. गुरांचे आठवडी बाजार सुरु असतांना कुणालाही काम करतांना कोरोना सदृष्य लक्षणे आढळून आल्यास त्याबाबत तातडीने महसूल, आरोग्य विभाग यांचेशी संपर्क करून संबंधीतांना तात्काळ उपचाराकरीता स्थानिक रुग्णालयात नेण्याची जबाबदारी ही संबंधीतांची राहील.

 ही परवानगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी गुरांचे आठवडी बाजाराकरीता निश्चित केलेल्या आठवड्यातून एका दिवसाकरीता राहील. याबाबत संबंधीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी वेळोवेळी भेट देऊन तपासणी करावी. जिल्ह्याकरीता लागू करण्यात आलेल्या आदेशात नमुद केलेल्या सुचनांना तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ