आरटीपीसीआरः374 अहवाल, एक पॉझिटीव्ह; रॅपिड ॲन्टीजेनःशून्य

 अकोला,दि.15(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 374 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 373 अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.14) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57845(43241+14427+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह एक.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 317586 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 313975 फेरतपासणीचे  402  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3209 नमुने होते. आजपर्यंत एकूण 317586 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 274345 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

एक पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात एकाचा अहवाल पाझिटीव्ह आला. त्यात एका पुरुषाचा समावेश असून तो अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.

 

19 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57845(43241+14427+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56690 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 19 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 115 चाचण्या

रॅपिड ॲन्टीजेनच्या काल (दि.14) दिवसभरात 115 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.  काल दिवसभरात अकोला महानगरपालिका येथे 22, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 51, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 32, हेगडेवार लॅब येथील 10 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 115 जणांच्या चाचण्या होऊन त्यात कुणाचाहीअहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ