अन्न व्यावसायिकांसाठी 1 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान परवाना व नोंदणी मोहिम

 अकोला,दि.28(जिमाका)- अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्न व्यवसायिकांना परवाना घेणे किंवा  नोंदणी  करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने अन्न व्यावसायिकांना जिल्हास्तरावर परवाना व नोंदणी करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे  दि. 1 ते 7 ऑक्टोंबर विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त सा. दे. तेरकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील ज्या अन्न व्यवसायिकांनी अद्यापर्यंत परवाना घेतला नाही अथवा नोंदणी केली नाही अशाकरीता ही मोहिम आहे. ज्या अन्न व्यवसायिकांची वार्षिक उलाढाल 12 लाखाच्या आत आहे असे अन्न व्यावसायि, यात प्रामुख्याने हातगाडीवर अन्नपदार्थ विक्री करणारे विक्रेते, चहा स्टॉलधारक, फळेभाजीपाला विक्रेते, पाणीपूरी, भेळपूरी, वडापाव स्टॉलधारक व तत्सम किरकोळ विक्रेते यांचा समावेश होतो. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल ही 12 लाखापेक्षा जास्त आहे, अशा अन्न आस्थापनांनी परवाना प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. याच गटातील व्यावसायिकांनी केवळ नोंदणी घेतली असेल त्यांनी परवानासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.

सर्व अन्न पदार्थ उत्पादक यांनी त्यांच्या अन्न पदार्थाच्या वर्गिकरणानूसार परवाना करणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत सर्व अन्न व्यावसायिकांनी  https:foscos,fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर परवाना नोंदणीसाठी अर्ज करावा. अर्ज करताना अडचण उद्भवल्यास किंवा अधिक माहितीकरीता सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सिव्हिल लाईन, अकोला येथे संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन अर्ज करणाऱ्या अर्जदारांना कार्यालयात वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. परवाना व नोंदणी मंजूर झाल्यानंतर ती अन्न व्यवसायीकांच्या खात्यात किंवा ईमेलवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल. त्याची  प्रत आपल्या आस्थापनेच्या दर्शनी भागात लावावी. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी विशेष मोहिम कालावधीत पात्रतेनुसार परवाना व नोंदणी प्राप्त करुन घ्यावी. परवाना व नोंदणी न करणाऱ्यावर कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.  

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ