जि.प.व पं.स.पोटनिवडणुक: मतदान केंद्र व मतमोजणी ठिकाण निश्चित

             अकोला, दि.28(जिमाका)-जिल्‍हा परिषद व त्‍याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्‍त पदाच्‍या पोट निवडणुकीसाठी जिल्ह्यात 488 मतदान केंद्र व तालुकास्तरावर मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.,पं.स. निवडणुक संजय खडसे यांनी दिली.

                        निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मंगळवार दि. 5 ऑक्टोंबर रोजी मतदान व बुधवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  त्यानुसार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात 77, अकोट तालुक्यात 81, मुर्तिजापूर तालुक्यात 83, अकोला तालुक्यात 85, बाळापूर तालुक्यात 74, बार्शिटाकळी तालुक्यात 49 व पातूर तालुक्यात 39 असे एकूण 488 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.

                        बुधवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरु होईल. मतमोजणीची ठिकाणे याप्रमाणे- तेल्हारा येथे नवीन इमारत तहसिल कार्यालय, अकोट येथे कृषि उत्पन्न बाजार समिती कास्तकार भवन, मुर्तिजापूर येथे शासकीय धान्य नवीन गोडाऊन, अकोला येथे शासकीय धान्य गोदाम जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बाळापूर येथे शासकीय धान्य गोदाम, बार्शीटाकळी येथे पंचायत समिती सभागृह तर पातुर येथे पंचायत समिती सभागृह, पातूर या ठिकाणी मतमोजणी निश्चित करण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ