मुर्तिजापूर तालुक्यातील सहा मंडळामध्ये अतिवृष्टी


अकोला,दि.7(जिमाका)- जिल्ह्यात सोमवार दि.6 चे रात्रीपासुन ते आज मंगळवार दि. 7 सप्टेंबरचे सकाळपर्यंत सर्व तालुक्यातील प्राप्त प्राथमिक अहवालानुसार मुर्तिजापूर तालुक्यातील सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची झाली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

तालुकानिहाय पावसाची नोंद पुढील प्रमाणे:

मुर्तिजापूर तालुक्यात आज 81.9 एम.एम. सरासरी पाऊस झाला असून तालुक्यातील सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात निंभा येथे 75.8, माना 90.8, शेलु 120.8, लाखापुरी 76.8, कुरुम 98.3, जामठी 92 एम.एम.  पाऊस झाला असून तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पुर आहे. परंतु कोणत्याही गावांचा संपर्क तुटलेला नाही. अकोला तालुक्यात आज 50.2 एमएम सरासरी पाऊस  झाला असून तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पुर आहे. परंतु कोणत्याही गावांचा संपर्क तुटलेला नाही. सद्यास्थितीत पाऊस थांबलेला आहे. तसेच सोमवार दि. 6 रोजी काटेपुर्णा नदीमध्ये वाहुन गेलेल्या दोन मुलांचे शोध कार्य सुरु आहे. बार्शिटाकळी तालुक्यात आज 50.9 एमएम सरासरी पाऊस झाला असून तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पुर आहे. परंतु कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. राजंदा मंडळामध्ये 80.5 एमएम पावसाची नोंद झाली आहे. तसेच मौजे एरंडा येथे रात्री झालेल्या पावसामुळे भिंत कोसळुन 70 वर्षीय शामराव आप्पा पवार  यांचा मृत्यु झाला.

अकोट तालुक्यात 39.5 एमएम. सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्व नदी नाल्यांना पुर आहे. परंतु कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. तसेच तालुक्यातील आसेगांव बाजार व वरुर येथे काही घरांमध्ये गावाजवळील नाल्याचे पाणी गेले आहे त्याबाबत पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे. तेल्हारा तालुक्यात 16.3 एमएम. सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्व नदी नाल्यांना पुर आहे. परंतु कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही.

बाळापुर तालुक्यात 26.1 एमएम. सरासरी पावसाची नोंद झाली असून  बाळापुर मंडळामध्ये 71.3 एमएम व व्याळा मंडळामध्ये 76 एमएम पावसाची नोंद झाली आहे. तसेच कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. पातुर तालुक्यात 41.9 एमएम. सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्व नदी नाल्यांना पुर आहे. परंतु कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही, असे जिल्हा प्रशासनाव्दारे विभागीय आयुक्त, अमरावती यांना प्राथमिक अहवालाव्दारे कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ