विशेष गौरव पुरस्कार; माजी सैनिक, पत्नी व पाल्यांनी 15 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करा

 


अकोला,दि.9(जिमाका)- विविध क्षेत्रात  अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व देशाची प्रतिष्ठा वाढविणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कारांचे निवड करण्याकरीता दि. 15 ऑक्टोंबरपर्यंत जिल्हा सैनिक कार्यालय, अकोला येथे अर्ज करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले

विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे माजी सैनिक,पत्नी, पाल्यांनी  आवश्यक पात्रतासह अर्ज मागविण्यात येत आहे.  

खेळातील पुरस्काराकरीता पात्रता : राष्ट्रीय, राज्यस्तराव खेळात भाग घेतलेला असल्यास खेळाचे नांव, राष्ट्रीय, राज्यस्तरावरील प्रमाणपत्र, उत्कष्ट कामगिरी किवा पदक मिळविल्याचे वर्तमानपत्रात प्रसिध्दी फोटो, राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धेत सुर्वण,रौप्य, कांस्य या पैकी मिळविणे आवश्यक किंवा आतंरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेले असावे. खेळामध्ये मिळालेले प्रमाणपत्र हे इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन (IOA), स्पोर्टस्‍ ऍथोरिटी ऑफ इंडिया (SAI), असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल फेडरेशन व त्यांशी संलग्न राज्यस्तरीय फेडरेशनचे असावे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय सहभागाची नोंद घेणेकरिता त्या आधीच्या जिल्हा व राज्यस्तरीय सहभागाचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे, वरील संस्थेव्यतिरीक्त इतर कोण्त्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार निवड समितीला असतील.

साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील पुरस्काराकरीता पात्रता: याकरीता राष्ट्रीय, राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त असावा, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य,  नाटय व इतर कला क्षेत्रात  अतिउत्कृष्ठ कामगिरी किंवा पुरस्कार मिळविल्याबाबत वर्तमानपत्रात प्रसिध्दी किंवा फोटो,  शासनमान्य किंवा नामवंत राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीयस्तरावरील संस्थेकडुन सन्मानीत केलेले असावे, वरील संस्थेव्यतिरीक्त इतर कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार निवड समितीला असतील.

नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगीरी करणाऱ्यांना पुरस्काराकरीता पात्रता: पुर, जळीत, दरोडा, अपघात, नैसर्गिक आपत्ती(भुकंप/वादळ) मध्ये बहुमोल कामगिरी केलेली असावी, नैसर्गिक आपत्तीमध्ये  बहुमोल कामगिरी केल्याबाबत क्रेंद्र किंवा राज्य शासन तसेच अन्य सामाजीक संस्थेव्दारे पुरस्कार, प्रशस्तीपत्र मिळाले असल्यास वर्तमानपत्रात प्रसिध्दी किंवा फोटो, नैसर्गिक आपत्तीमध्ये  बहुमोल कामगिरी केल्याबाबत क्रेंद्र, राज्य शासन तसेच अन्य नामवंत संस्थव्दारे पुरस्कृत असावे. मान्यता प्राप्त संस्थेव्यतिरीक्त इतर कोण्त्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार निवड समितीला असतील.

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरीसाठी पुरस्काराकरीता पात्रता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळातून(पुणे, नागपुर, औरंगाबाद,मुंबई,अमरावती, कोल्हापुर ,नाशिक, व लातुर,) इयत्ता दहावी व बारावी मंडळाच्या परिक्षेमध्ये 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच (5X10 मंडळे = 50 असे इ. दहावीचे एकुण 50 पाल्य व इ. बारावीचे एकुण 50 पाल्य) माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना एक रक्कमी दहा हजार रुपये  विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.  पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना एक रक्कमी दहा हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस नामवंत ख्यातीप्राप्त संस्थमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.  शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीकरीता फक्त गतवर्षातील (Preceding Year) प्रकरणे स्विकारली जातील, केंद्रीय शिक्षण बोर्ड, नवी दिल्ली येथुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या ग्रेड शिट निष्पादन प्रमाणपत्रामध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शविण्यात येत नाही. प्रकरणासोबत संबंधीत विद्यालयाचे गुणपत्रक (Statement of Marks) टक्केवारीसह जोडणे आवश्यक आहे.

यशस्वी उद्योगजकांचा पुरस्कामिळवणाऱ्याकरीता पात्रता : यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणाऱ्यांना राष्ट्रीय, राज्यस्तरावर वृत्तपत्र किंवा मासिक अथवा राज्यस्तरावरचे व्यावसायिक स्तरावरचे संघटन यांनी पुरस्कृत केलेले असावे. कृषी क्षेत्रात भरघोस उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यास शासनातर्फे पारितोषिक व गौरवपत्र प्राप्त असावे किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे कडुन प्रशस्तीपत्र प्राप्त असावे. या संस्थेव्यतिरीक्त इतर कोणताही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार निवड समितीला असतील.

सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कामिळवणाऱ्याकरीता पात्रता: सामाजिक क्षेत्रात राज्यस्तरावर प्रशांसा किंवा बहुसंख्य लोकांचा फायदा होईल असे कार्य असावे,  पर्यावरणामध्ये आमूलाग्र बदल घडवुन आणल्यामुळे त्या भागातील किंवा बहुसंख्य लोकांचा फायदा होईल असे कार्य केलेले असावे. सामाजिक कार्य पर्यावरणविषयक कार्य करणाऱ्या नामवंत, संस्था, वृत्तपत्र यांचेकडुन गौरव किंवा प्रशस्तीपत्र मिळाले असावे.

वरील पात्रता प्राप्त माजी सैनिक,पत्नी, पाल्यांनी विशेष गौरव पुरस्काराकरीता अर्ज करावा. पुरस्कारांचे छापील अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी दिली.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ