ऑक्टोबर महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण निश्चित
अकोला, दि.१५(जिमाका)- जिल्ह्यासाठी ऑक्टोबर महिन्यासाठी लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.
वाटप
परिमाण व दर याप्रमाणे-
१.
प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी
(गहू/मका/ज्वारी) तीन किलो प्रतिव्य क्ती,दर दोन रुपये प्रति किलो.
२.
प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी
तांदूळ दोन किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रति किलो.
३.
अंत्योदय अन्न योजना गहू- १५ किलो
प्रति कार्ड, दोन रुपये प्रति किलो.
४.
अंत्योदय अन्न योजना तांदूळ-२०
किलो प्रति कार्ड, तीन रुपये प्रति किलो.
५.
एपीएल शेतकरी कुटुंब
लाभार्थ्यांकरीता गहू-चार किलो प्रति व्यक्ती, दोन रुपये प्रति किलो.
६.
एपीएल शेतकरी कुटुंब
लाभार्थ्यांकरीता तांदूळ- एक किलो प्रति व्यक्ती, तीन रुपये
प्रति किलो.
७.
नियंत्रित साखर अंत्योदय
लाभार्थ्यांकरीता-एक किलो प्रति शिधापत्रिका, २० रुपये
प्रतिकिलो.
८.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न
योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील
लाभार्थ्यांसाठी गहू, तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह तीन किलो गहू,
दोन किलो तांदूळ (मोफत)
९.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न
योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना गहू व
तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ
(मोफत)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा