संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता सर्तक राहून लसीकरण वेगाने करा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

 



 

           अकोला,दि.3(जिमाका)- वैद्यकीयटास्क फोर्सच्या ज्ञांनी कोविडची तिसरी लाट येईल, अशी शक्यता वर्तविली आहे. संभाव्य लाटेकरीता शासकीय रुग्णालय व आरोग्य विभागासह सर्व यंत्रणानी सतर्क राहून लसीकरण मोहिम अधिक वेगाने करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

            जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोविड टास्क फोर्स व तांत्रिक समितीची आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसू,  उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.डी. अष्टपुत्रे, डॉ. नितीन अंभोरे, डॉ.जी.जी. राठोड, डॉ. दिनेश नैताम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक आदि उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता सर्वांना अधिक सतर्क राहून चाचण्या वाढविणे, लसीकरण वेगाने करणे, गर्दीच्या ठिकाणी कार्यवाही करणे यासारखे उपाययोजना तातडीने राबवावी. दुसरा डोज घेण्याऱ्याची संख्या लक्षात घेवून त्यांना प्राधान्याने लसीकरण करावे. याकरीता लसीकरण केंद्र वाढवावे. लसीकरण विषयी जनजागृती निर्माण करुन लसीकरण करण्याकरीता प्रोत्साहित करावे. गर्दीच्या ठिकाणी व ग्रामीण भागात कोविड चाचण्याचे प्रमाण वाढवावे, रुग्णाची संख्या जास्त येणाऱ्या ठिकाणी संर्पक तपासण्या करा, असेही निर्देश दिले.

            येणाऱ्या काळात सर्व आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. तसेच ऑक्सीजन लिकेज, औषध तुटवडा याबाबत खात्री करुन घ्यावी. रुग्णालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना तिसऱ्या लाटेच्या मार्गदर्शन सूचनाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ