273 अहवाल, शुन्य पॉझिटीव्ह; दोन डिस्चार्ज

 


अकोला,दि.5(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 273 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 273 अहवाल निगेटीव्ह तर शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि. 4) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57826(43226+14423+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य  = एकूण पॉझिटीव्ह शुन्य.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 314892 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 311294 फेरतपासणीचे  402  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3196 नमुने होते. आजपर्यंत एकूण 314892 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 271666 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शुन्य पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.

दोन जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

१६ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57826(43226+14423+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56674 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 16 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन