जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: बी.पी. ठाकरे मेमोरियल रक्तपेढी सिल


            अकोला,दि.4 (जिमाका)-  लहान बालिकेस एच आय व्ही संक्रमित रक्त पुरवठा केल्याप्रकरणी येथील श्री. बी.पी. ठाकरे मेमोरियल रक्तपेढीसिलबंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी महापालिका आयुक्तांना आज दिले आहेत.

            एचआयव्ही संक्रमित रक्त दिल्याबाबतची घटना निदर्शनास आल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून एच.आय.व्ही. संक्रमित रक्त पुरवठ्याबाबत चौकशी अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या चौकशी अहवालानुसार श्री. बी.पी. ठाकरे, मेमोरियल रक्तपेढीच्या कामात तांत्रिक त्रुटी आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे असे प्रकार पुनश्च: होऊ नये याकरीता पुढील कार्यवाही होईपर्यंत श्री. बी.पी. ठाकरे, मेमोरियल रक्तपेढी तातडीने सिलबंद करण्यात यावी तसेच ही रक्तपेढी पुढील कार्यवाहीकरीता अन्न व औषध प्रशासन विभागाकडे हस्तांतरीत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेशात अकोला मनपा आयुक्तांना  दिले आहेत. 

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ