मिठाई व फरसाण उत्पादक-विक्रेताकरीता कार्यशाळेचे आयोजन

 


अकोला,दि.9(जिमाका)- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मिठाई  व फरसाण उत्पादक-विक्रेते  यांच्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील  फरसाण मिठाई उत्पादक-विक्रेते मोठया संख्येने उपस्थित होते.

सहायक आयुक्त तेरकर यांनी  अन्न सुरक्षा व मानदे  कायदा 2006 ची मूलभूत तत्वे विशद केली. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी यांनी मिठाई विक्रेते यांनी मिठाई उत्पादन व विक्री दरम्यान सुरक्षितपणे उत्पादनाकरिता आवश्यक बाबीचे सादरीकरण केले. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी वाकडे यांनी तळण्याकरिता वापरलेले तेलाचे पुनर्वापर न करता त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

अकोला जिल्हा खाद्य पेय विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी जिल्ह्यातील मिठाई उत्पादक व विक्रेते हे सर्व तरतुदींचे पालन करुन उत्पादन चांगल्या दर्जाचा व पद्धतीचा अवलंब करतील. तसेच   सुट्या मिठाई बाबत भारतीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाने जारी केलेल्या उत्पादन दिनांक तसेच सर्वोत्तम दिनांकबाबतच्या आदेशाचे पालन करु, असे आश्वासन दिले.

अन्न सुरक्षा अधिकारी वाकडे यांनी कार्यशाळेला उपस्थितांचे आभार मांडले. या कार्यशाळेला अन्न व औषध प्रशासनचे अन्न सुरक्षा अधिकारी नवलकर, ताथोड, काळे उपस्थित होते

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ