वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 अकोला, दि.१६(जिमाका)-  विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत सामाजिक, आर्थिक व शैक्षणीक उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. यात वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना(बॅंकेमार्फत कर्जमर्यादा १० लाखांपर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (बॅंकेमार्फत कर्जमर्यादा १०  ते ५० लाखांपर्यंत)  या योजनांचा समावेश आहे. या योजनांची सर्व माहिती महामंडळाच्या www.vjnt.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याबाबत काहीही अडचण निर्माण झाल्यास  महामंडळाचे कार्यालय, पहिला मजला, वैष्णवी कॉम्प्लेक्स, पावर हाऊस समोर, गोरक्षण रोड, अकोला, दुरध्वनी ०७२४-२४५९९३७ येथे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एच.जी. आत्राम यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम