अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजना; ऑक्टोबर महिन्यासाठीचे नियतन

 अकोला,दि.१५ (जिमाका)- जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी माहे ऑक्टोबर करिता गहु व तांदुळाचे मासिक नियतन मंजूर झाले आहे.

ते याप्रमाणे, प्राधान्य गटाकरीता अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ९६ हजार ४३९ लाभार्थ्यांना गहुचा ५८९३ क्विं. तर तांदुळाचा ३९२९ क्विं., अकोला ग्रामीण  शासकीय धान्य गोदाम येथे २ लक्ष ७ हजार ३२१ लाभार्थ्यांना गहू ६२२० क्विं.  तर तांदुळ ४१४६‍ क्विं., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ७ हजार ७५१ लाभार्थ्यांना गहू ३२३३ क्विं.  तांदुळ २१५५ क्विं., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ३४ हजार ३४२ लाभार्थ्यांना गहू ४०३० क्विं. तर तांदुळ २६८७ क्विं., तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष १० हजार ५१० लाभार्थ्यांना गहू ३३१६ क्विं.,तांदुळ  २२१० क्विं., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ३५ हजार ४३४ लाभार्थ्यांना गहू ४०६३ क्विं. तर तांदुळ २७०८ क्विं., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे ९२ हजार २२० लाभार्थ्यांना गहू २७६७  क्विं.  तर तांदुळाचा १८४४ क्विं.  व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष १५ हजार ५८५ लाभार्थ्यांना गहुचा ३४६८ क्विं. तर तांदुळाचा २३११ क्विं., असे एकूण १० लक्ष ९९ हजार ६०२ लाभार्थ्यांना ३२९९० क्विंटल गहू तर २१९९० क्विंटल तांदुळ  असे नियतन मंजूर झाले आहे.

अंत्योदय लाभार्थ्यांसाठी अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे १३२० शिधापत्रिकांना १९८ क्विं. गहू, २६४ क्विं. तांदुळ, अकोला ग्रामीण  शासकीय धान्य गोदाम येथे ७११४  शिधापत्रिकांना १०६७ क्विं. गहू, १४२४ क्विं. तांदुळ, बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम ६९६४ शिधापत्रिकांना १०४५क्विं. गहू, १३९४ क्विं. तांदुळ, अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे ६९४७ शिधापत्रिकांना १०४२ क्विं. गहू, १३९० क्विं. तांदुळ, तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे ६४१९ शिधापत्रिकांना ९६२ क्विं. गहू, १२८४ क्विं. तांदुळ,बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे ५४५० शिधापत्रिकांना ८१७ क्विं. गहू, १०९० क्विं. तांदुळ, पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे ४७५५ शिधापत्रिकांना ७१३ क्विं. गहू, ९५२ क्विं. तांदुळ,व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे ६३०९ शिधापत्रिकांना ९४६ क्विं. गहू, १२६२ क्विं. तांदुळ,., असे एकूण ४५ हजार २७८ शिधापत्रिकांना  ६७९० क्विंटल गहू तर  ९०६० क्विंटल तांदुळ असे नियतन मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ