पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन

 अकोला,दि.14(जिमाका)- राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व तदनंतर आलेल्या पूरस्थितीमुळेबाधीत झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी धर्मदाय संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.स्थानिक पातळीवर संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून गरजूंना मदत वाटप करावी. तसेच तसेद्च आर्थिक मदत देण्यासाठी  मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये धनादेशाद्वारे पाठवावी. धनादेश पाठविण्यासाठी माहिती- मुख्यमंत्री सहायता निधी, बचत खाते क्रमांक 10972433751, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, मुंबई, मुख्य शाखा फोर्ट, मुंबई-400001, शाखा कोड-00300, आयएफएससी कोड SBIN00003000.

तरी धर्मदाय संस्थांनी वरील प्रमाणे धनादेश काढून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत पाठवावी,असे आवाहन धर्मादाय आयुक्त प्र. श्रा. तरारे यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ