429 अहवाल, एक पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज; रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह


अकोला,दि.21(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 429 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 428 अहवाल निगेटीव्ह, एक अहवाल पॉझिटीव्ह आला, तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे..

त्याच प्रमाणे काल (दि.20) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57851(43247+14427+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह एक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 319519 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 315900 फेरतपासणीचे 402  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3217 नमुने होते. आजपर्यंत एकूण 319519 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 276272  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

एक पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका पुरुषाचा समावेश असून हा रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवाशी आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.

एक डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथील एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

16 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57851(43247+14427+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56699 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 16 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 174 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.20) दिवसभरात झालेल्या 174 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

       काल दिवसभरात अकोला महानगरपालिका येथे 107, उपजिल्हा कर्मचाऱ्यांरी एक,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 46, हेगडेवार लॅब येथे 16 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 170 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा