जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक; मतदान 5 ऑक्टोबरला

 अकोला, दि.14(जिमाका)-  न्यायायलाच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार अकोला जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समिती मधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार  अकोला जिल्हा परिषदेच्या 14 निवडणूक विभाग व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या 28 निर्वाचक गणांच्या रिक्त पदांसाठी  पोटनिवडणूक होणार असून मंगळवार,दि.5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांनी दिली आहे.

यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, पोटनिवडणूक कार्यक्रम याप्रमाणे असेल-

 

 मंगळवार दि.21 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होऊन वैध  उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. याबाबत न्यायालयात अपिल करावयाचे असल्यास  त्यासाठी शेवटची तारीख शुक्रवार दि.24 सप्टेंबर ही आहे. न्यायाधीशांनी  अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची अंतिम तारीख दि.27 सप्टेंबर ही आहे. नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी दि.27 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील.   अपील निकालात काढल्यावर  त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. तसेच त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप होईल.

 अपील असलेल्या ठिकाणी दि. 29 सप्टेंबर 2021  पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील.  तसेच त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप होईल, दि. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान (सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वा पर्यंत) ; तर दि.6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी (सकाळी दहा वा. पासून) होईल.  निवडून आलेल्या सदस्यांची यादी  शुक्रवार दि.8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल,असे जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ