३१ अहवाल प्राप्तः३० निगेटीव्ह तर एक पॉझिटीव्ह; तिघांना घरी सोडले
अकोला , दि . ३० ( जिमाका )- आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ३१ अहवाल प्राप्त झाले . त्यातील ३० अहवाल निगेटीव्ह आले आहेत . तर बैदपूरा येथील फतेह चौक भागातील एका ६१ वर्षीय व्यक्तीचा पॉझिटीव्ह अहवाल आला आहे. दरम्यान बैदपूरा येथील तीन रुग्णांना पुर्ण बरे झाल्यानंतर आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६८२ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६४८ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ६२० अहवाल निगेटीव्ह २८ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ३४ अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण ६८२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५३४, फेरतपासणीचे ८७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६४८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५०० तर फेरतपासणीचे ८७ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६२० आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २८ आहेत. आज प्राप्त झालेल्या ३१ अहवालात ३० अहवाल निगेटीव्ह आले ...