अकोला, बुलडाणा येथील प्रवासी सुखरूप

 

अकोला, बुलडाणा येथील प्रवासी सुखरूप

अकोला, दि. २३ : ‘गुरूमाऊली टुर्स’च्या माध्यमातून काश्मिर येथे पोहोचलेले ३१ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली असून, तसे राज्य नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले, तसेच प्रवाश्यांशी संपर्क करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे देण्यात आली.

पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या दुर्घटनेच्या अनुषंगाने ‘गुरूमाऊली टुर्स अँड ट्रॅव्हल्स’चे समन्वयक अंबादास सप्रे यांच्यामार्फत दूरध्वनी संदेशान्वये जिल्हा नियंत्रण कक्षाला माहिती प्राप्त झाली. त्यानुसार या कंपनीने काश्मिर येथे यात्रा आयोजित केली. त्यात अकोला, बुलडाणा व पुणे येथील ३१ प्रवासी रेल्वेने काश्मिर येथे पोहोचले आहेत.

सद्य:स्थितीत हे पर्यटक श्रीनगर येथील डल नेकजवळ असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी असून, सर्व सुखरूप असल्याची माहिती श्री. सप्रे यांच्याकडून नियंत्रण कक्षाला मिळाली. ही माहिती मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे तातडीने माहिती व संबंधित यादी राज्य नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली, तसेच प्रवाश्यांशी संपर्क करण्यात येत आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे कळविण्यात आले आहे.

०००   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा