हमीदराने हरभरा खरेदीसाठी २२ केंद्रांवर नोंदणी सुरू
हमीदराने हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू
अकोला, दि. ४ : नाफेडतर्फे आधारभूत किंमत योजनेत हमीदराने हरभरा खरेदीसाठी
अकोला व वाशिम जिल्ह्यात २२ केंद्रांवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अकोला
व वाशिम जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी दिली.
हंगाम २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेत हरभरा खरेदीसाठी
दि. २५ एप्रिलपर्यंत नोंदणी सुरू राहील. शेतक-यांनी आधारपत्र, सातबारा, ऑनलाईन पीकपेरा,
आधार जोडणी असलेल्या बँक खातेपुस्तिकेची छायाप्रत, भ्रमणध्वनी क्रमांक आदी कागदपत्रांसह
संबंधित खरेदी केंद्रावर जाऊन हरभरा खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समित्यांची बाळापूर, वाडेगाव, बार्शिटाकळी,
पातूर, मालेगाव आदी कार्यालये, आलेगाव येथे शत्रूंजय शेतकरी उत्पादक कंपनी, कवठा येथे
ॲग्रीस्टॉक शेतकरी उत्पादक कंपनी, बेलखेड येथील शेतकरी उत्पादक कंपनी, पारस येथे स्व.
वसंतराव दांदळे खासगी कृषी उत्पादक कं., वक्रतुंड शेतकरी उत्पादक कं., थार एमआयडीसी,
आगर रस्ता येथील अनंतकोटी कृषी उत्पादक कं., विवरा येथे जय पुंडलिक माऊली कृ. उ. कं.,
ए. ए. कारंजा शेतकरी उत्पादक कंपनी, मानोरा, संत गजानन महाराज नाविन्यपूर्ण कृषी प्रक्रिया
सहकारी संस्था, रिसोड, राजगाव, देगाव, विदर्भ कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्था,
वाशिम, वैषल्या ॲग्रो फार्मर कं., लोणी, संत गुलाब महाराज शे. उ. कं. निंबोळी, मंगलमूर्ती
शे. उ. कं., चोहट्टा बाजार, संत नरहरी महाराज शे. उ. कं., मुंडगाव, म्हैसने ॲग्रो फार्मर
प्रो. कं., मनकी, वक्रतुंड शेतकरी प्रो. कं., तेल्हारा आदी केंद्रांवर नोंदणी सुरू
आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा