मृद व जलसंधारण कामांचे ‘मॅपिंग’ करण्यासाठी शिवार फेरी नियोजनासाठी बैठकांना सुरूवात


 (छायाचित्र - सोनाळा या गावातील गत पावसाळ्यातील दृश्य)

----------------------

मृद व जलसंधारण कामांचे ‘मॅपिंग’ करण्यासाठी शिवार फेरी

नियोजनासाठी बैठकांना सुरूवात

अकोला, दि. 3 : राज्यात गत वर्षात झालेल्या मृद व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी होणार असून, यासंबंधीच्या ३९ प्रकारांच्या कामांचे मॅपिंग करण्यासाठी शिवारफेरी काढण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने नियोजनासाठी तालुकास्तरीय बैठकांना सुरूवात झाली आहे. अकोला तालुक्याची बैठक उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या अध्यक्षतेत झाली. उपविभागीय जलसंधारण अधिकारी सचिन वानरे, जलसंधारण अधिकारी प्रियांका पंडे, गटविकास अधिकारी एम. डी. मुंडे, तालुका कृषी अधिकारी विजय कोकणे आदी उपस्थित होते. दि. ३१ मेपूर्वी सर्व कामे पूर्ण होतील असे नियोजन करण्याचे निर्देश डॉ. जावळे यांनी दिले.

शिवारफेरी कार्यक्रमात प्रत्येक गावात पथकप्रमुखांसह सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, प्रगतीशील शेतकरी, रोजगारसेवक, पाणलोट कार्यकर्ते आदींचा सहभाग असेल. कामांचे मॅपिंग व प्रत्यक्ष स्थळ पडताळणीसाठी ‘एमएसआरएसी’ने मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले असून, कामांचे उपग्रहाधारित लोकेशन आदी माहिती ॲपमध्येच उपलब्ध होणार आहे. पथकप्रमुख म्हणून उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जलसंधारण अधिकारी, कृषी सहायक, पर्यवेक्षक, वनपाल, पाणलोट विकास पथकाचे सदस्य काम पाहतील, अशी माहिती श्री. वानरे यांनी दिली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम