जात पडताळणी अर्जातील त्रुटीपूर्ततेसाठी शिबिर
जात पडताळणी अर्जातील त्रुटीपूर्ततेसाठी शिबिर
अकोला, दि.२८ : जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात पडताळणी अर्जांतील त्रुटींची पूर्तता करून
घेण्यासाठी विशेष त्रुटी पूर्तता शिबिर दि. २ मे रोजी स. १० वा. समितीच्या कार्यालयात
आयोजित करण्यात आले आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात इयत्ता ११ वी, १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी
व व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ इच्छित असलेले विद्यार्थ्यांचे जात वैधता
प्रमाणपत्रासाठी अर्ज केले, त्यात त्रुटी आढळुन आल्या. त्याची माहिती संबंधितांना ई-मेल
व एसएमएसद्वारे कळवण्यात आली आहे. अद्यापही उमेदवाराकडून त्रुटींची पूर्तता करण्यात
आली नाही. त्यामुळे त्रुटी पूर्तता करण्यासाठी शिबिर घेण्यात येणार आहे.
जात वैधता प्रमाणपत्राअभावी कोणाचेही शैक्षणिक नुकसान होऊ नये व पुढील
शिक्षणापासुन वंचित राहू नये त्याकरिता विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र जास्तीत
जास्त विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी हे शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत
ही ज्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. अशा विद्यार्थी- विद्यार्थीनी
दि.२ मे रोजी शिबीराच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रकरणांची पावती व त्रुटी पुर्ततेच्या
मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन
समिती अध्यक्ष जितेंद्र सा. काकुस्ते, उपायुक्त अमोल यावलीकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत
यांनी केले आहे.
समिती कार्यालयाचा पत्ता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जिल्हाधिकारी
कार्यालय परिसर प्रशासकीय इमारत, दुसरा माळा येथे आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा