बालकल्याण समिती सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 बालकल्याण समिती सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन


अकोला, दि. १५ : जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष व ४ सदस्य तसेच बाल न्याय मंडळाचे २ सदस्य अशी पदे भरण्यात येत आहेत. त्यासाठी इच्छुकांनी दि. २४ एप्रिलपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.


बाल न्याय कायद्यानुसार महिला व बालविकास विभागातर्फे या समितीची नियुक्ती केली जाते. महिला व बालकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज पात्रता, अनुभव आदींसह चार प्रतींत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*