घरकुल निर्मितीत अकोला जिल्हा राज्यात दुसरा 100 दिवसीय कार्यक्रमात उद्दिष्टापेक्षा 83 टक्के अधिक काम

 


अकोला, दि. 18 : ग्रामीण गृहनिर्माण योजनेत 100 दिवसांचे उद्दिष्ट पूर्ण करून अकोला जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. उद्दिष्टाच्या 183 टक्के काम करून साडेचार हजारावर घरकुले पूर्ण केली आहेत.

शासनाच्या 100 दिवस कार्यक्रमात महाआवास अभियान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना ग्रामीण भागात जिल्ह्याचे 2 हजार 516 उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. ग्रामीण आवास योजनेच्या दुस-या टप्प्यात जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थींना घरकुल मंजुरीपत्र व २१ हजार ६२७ लाभार्थींना पहिला हप्त्याचे वितरण राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाले होते. महाआवास योजनेत अधिकाधिक घरे पूर्ण करून गरजूंना लाभ मिळवून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार प्रक्रिया गतीने राबविण्यात आली.

या प्रक्रियेत घरकुलांना मंजुरी देणे, प्रथम हप्ता वितरित करणे, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करणे, घरकुल बांधकाम पूर्ण करणे असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. प्रशासनाकडून कामाला गती देत उद्दिष्टापलीकडे जाऊन एकूण 4 हजार 600 घरकुले पूर्ण  करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामीण गृहनिर्माण संचालक कार्यालयाकडून जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले आहे.

     राज्यात रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम व अकोला जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर  मिळणार असल्याने त्यांचे जीवनमान सुरक्षित आणि स्थिर होण्यासाठी मदत होणार आहे. पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या मार्गदर्शनात प्रकल्प संचालक मनोज जाधव, जिल्हा प्रोग्रामर, जिल्हा ऑपरेटर यांच्यासह गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, घरकुल ऑपरेटर गावस्तरावर सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, रोजगार सेवक आदी परिश्रम घेत आहेत.

कोट

जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना हक्काचा निवारा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. याकरता जिल्हास्तरावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, तालुकास्तरावर सर्व गट विकास अधिकारी व गाव स्तरावर सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी परिश्रम घेत आहेत- अनिता मेश्राम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला


०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा