ज्वारी, बाजरी व मका हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू
ज्वारी, बाजरी व मका
हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू
अकोला, दि. २३ : आधारभूत किंमत खरेदी योजनेत शेतकऱ्यांकडून ज्वारी,
बाजरी व मक्याची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी
करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाळापूर, कवठा, निंबा फाटा, कान्हेरी गवळी, तेल्हारा, अकोट, मुंडगाव
अकोला, लाखनवाडा, मूर्तिजापूर, पातूर, आलेगाव व बार्शीटाकळी येथील खरेदी केंद्रावर
३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. खरेदी १ मे ते ३० जून दरम्यान करण्यात येणार आहे.
संकरित ज्वारीचा हमीभाव प्रतिक्विंटल
३ हजार ३७१ रू. असून, मालदांडी ज्वारीचा हमीदर ३ हजार ४२९ रू. आहे. मक्याचा हमीभाव
प्रतिक्विंटल २ हजार २२५ रू. असून, बाजरीचा हमीदर प्र. क्विं. २ हजार ६२५ रू. आहे.
शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर
एनईएमएल पोर्टलवर करण्यासाठी शेतक-यांचा पिकाचा उल्लेख असलेला सातबारा उतारा आधारपत्राची
प्रत, आधार जोडणी असलेले बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, शेतकऱ्याचा फोटो आवश्यक
आहे. देय रक्कम अदा करण्याची प्रणाली पीएफएमएस असून, संयुक्त बँक खाते चालणार नाही.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे
आवाहन जिल्हा पणन अधिका-यांनी केले आहे.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा