उष्माघात व उष्णतेच्या लाटेबाबत सुचना
उष्माघात व उष्णतेच्या लाटेबाबत सुचना
अकोला दि. 8 : प्रादेशिक हवामान विभाग नागपुर यांचे दिनांक 8 एप्रिल 2025 चे प्राप्त संदेशानुसार दि. 8 एप्रिल ते दि. 9 एप्रिल 2025 दरम्यान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाव्दारे नागरिकांना सुचित करण्यात येत आहे.
काय करावे : तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री टोपी, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी, रुमाल, दुपट्टा वापर करण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, कैरीपाणी, लिंबूपाणी, ताक इत्यांदीचा नियमित वापर करण्यात यावा. 7 अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. विविध शासकीय व खाजगी आस्थापनांनी कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. गरोदर महीला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. उष्माघाताचे लक्षण दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा,
काय करु नये : लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमाण अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावे. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये, मद्य सेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेवू नये, त्यामुळे डीहायड्रेशन होते. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा