आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष शिबिर

 आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष





हृदय तपासणी शिबिरात ७४ व्यक्तींची तपासणी

अकोला, दि. १५ :आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सहकार संकुल येथे हृदय तपासणी शिबिर नुकतेच झाले. विविध सहकारी संस्था, कार्यालयांच्या सदस्यांनी त्याचा लाभ घेतला.

शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रीतेश इंगोले यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. डॉ. के. एस. पाटील रूग्णालयाचे सहकार्य मिळाले. ब्लड शुगर, रक्तदाब, ईसीजी, लिपीड प्रोफाईल, एचबीएवनसी आदी महत्वाच्या तपासण्या विनामूल्य करण्यात आल्या. शिबिराचा ७४  महिला व पुरूष सदस्यांनी लाभ घेतला. जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, सहकार अधिकारी राजेश्वर बोंद्रे, बाळू पापळकर, नारायण रोकडे, जयंत सहारे, गजानन कवळे आदी उपस्थित होते.

 

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त स्वच्छता मोहिम, क्रीडा स्पर्धा, ग्राहक मेळावा, तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन होत असल्याचे डॉ. लोखंडे यांनी यावेळी सांगितले.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना