जात पडताळणी त्रुटींचे निराकरण करणार मंगळवारी लोकशाहीदिन उपक्रम
जात पडताळणी त्रुटींचे निराकरण करणार
मंगळवारी लोकशाहीदिन उपक्रम
अकोला, दि. ३ : जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
करण्यात आले आहे. त्यात जात पडताळणीच्या प्रलंबित अर्जांतील त्रुटी दूर करून अर्ज निकाली
काढण्यात येतील.
समितीचे सर्व सदस्य लोकशाही दिनी उपस्थित राहणार आहेत. ज्या उमेदवारांनी
जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज सादर केले आहेत, अशा उमेदवारांचे त्रुटीमुळे
प्रकरण प्रलंबित असल्याबाबत पूर्तता करून घेऊन निराकरण करण्यात येईल.
सर्व उमेदवारांनी समिती कार्यालयात उपस्थित राहुन सदर संधीचा लाभ घ्यावा,
असे आवाहन समितीचे अध्यक्ष जितेंद्र सा. काकुस्ते, उपायुक्त तथा सदस्य अमोल यावलीकर
व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा