डिलीव्हरी बॉय, फ्रीलान्सर्सचा समावेश असंघटित कामगारांना विमा व सुरक्षा योजनांचा लाभ ई- श्रम पोर्टलवर नोंदणी आवश्यक

 

डिलीव्हरी बॉय, फ्रीलान्सर्सचा समावेश

असंघटित कामगारांना विमा व सुरक्षा योजनांचा लाभ

ई- श्रम पोर्टलवर नोंदणी आवश्यक

अकोला, दि. ३: असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास त्यांना विनामूल्य अपघात विमा संरक्षण, सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ, सरकारी योजनांशी थेट जोडणी, तसेच भविष्यातील कल्याणकारी योजनांमध्ये समावेश होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने गीग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

डिलीव्हरी बॉय, फ्रीलान्सर्सला लाभ

ई- श्रम पोर्टलवर झोमॅटो, स्वीग्गी, ओला, अर्बन कंपनी, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यासारख्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय, चालक, फ्री लान्सर, घरगुती सेवा पुरवठादार आणि इतर असंघटित कामगारांना नोंदणी करता येईल. १६ ते ५९ वर्षे वयोगटातील कामगार नोंदणी करू शकतात. तथापि, प्राप्तीकर भरणारे, तसेच ‘ईपीएफओ’ आणि ‘ईएसआयसी’चे सदस्य असलेल्या कामगारांना यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

नोंदणीसाठी आधारपत्र, आधार जोडणी असलेला भ्रमणध्वनी क्रमांक, पॅनकार्ड आणि बँक खाते तपशील आदी आवश्यक आहे. कामगारांनी नोंदणीसाठी महा ई-सेवा केंद्राला भेट द्यावी किंवा अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी  गोरक्षण रस्त्यावरील श्रद्धा हाइट इमारतीमधील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे किंवा ०७२४-२४५९२८९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम