फळपिक विमाधारकांना ई-पीक पाहणी आवश्यक
फळपिक विमाधारकांना ई-पीक
पाहणी आवश्यक
अकोला, दि. २४ : पुनर्रचित
हवामानाधारित फळपिक विमा योजनेत जिल्ह्यात
युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत मृग बहारामध्ये डाळिंब, पेरू,
मोसंबी, लिंबू, संत्रा या फळपिकांसाठी. तर अंबिया बहारात सन २०२४-२५ मध्ये केळी, डाळिंब, पपई, मोसंबी, संत्रा या फळपीकांसाठी
राबविण्यात येत आहे.
योजनेत
सहभागी होणा-या शेतक-यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतक-यांनी
फळपिकांचा विमा घेतलेला आहे. परंतु फळपीकांची ई – पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाइल अॅपद्वारे केलेली नाही. त्यांनी दि.२५ एप्रिलपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावयाची आहे. अन्यथा दि. १२ जून २०२४ रोजीच्या शासन
निर्णयातील तरतुदी नुसार ७/१२ उता-यावर ई-पीक पाहणीची
नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपिक विम्याचा लाभ दिला जाणार
नाही, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी स्पष्ट केले आहे.
ज्या शेतक-यांनी फळपिकांचा
विमा घेतलेला आहे त्यांनी ई-पिक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाइल अॅपद्वारे दि.२५
एप्रिल,२०२५ पर्यंत पूर्ण करावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा