शाखा डाकपालाचा गैरव्यवहार; टपाल खातेदारांना माहिती सादर करण्याचे आवाहन

 

 

शाखा डाकपालाचा गैरव्यवहार;

टपाल खातेदारांना माहिती सादर करण्याचे आवाहन  

 

अकोला, दि. २१ : टपाल खात्याच्या वाई परगणे येथील शाखा डाकपालाने बचत योजनांतील शासकीय रकमेचा खासगी कामांसाठी वापर केला. त्याबाबत कारवाई सुरू आहे. दरम्यान, या शाखेच्या खातेदारांनी आपल्या बचत ठेव योजना, रकमा आदी माहिती कागदपत्रांसह दि. २५ एप्रिलपूर्वी सादर करण्याचे आवाहन खात्याच्या प्रवर अधिक्षकांनी केले आहे.  

कारंजा उपडाकघरअंतर्गत वाई परगणे शाखा आहे. तेथील शाखा डाकपाल संजय शाळिग्राम भुयटे यांनी खातेदारांच्या बचत खाते, आवर्ती जमा, सुकन्या समृद्धी योजना अशा विविध खात्यांतील शासकीय रकमेचा गैरव्यवहार करून ती खासगी कामासाठी वापरल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला. त्याबाबत कारवाई सुरू आहे.

दरम्यान, या शाखेच्या खातेदारांनी आपले संबंधित बचत योजनेचे खातेपुस्तक किंवा तत्सम कागदपत्रे दि. २५ एप्रिलपूर्वी सहाय्यक अधीक्षक, वाशिम पश्चिम उपविभाग, मूर्तिजापूर यांच्याकडे तपासणीसाठी सादर करावीत. जे खातेदार मुदतीत आपले पुस्तक तपासणीला सादर करणार नाहीत, त्यांचा कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही, असे आवाहन प्रवर अधिक्षकांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा