जिल्हाधिका-यांच्या हस्ते अनाथ बालकांना प्रमाणपत्रांचे वाटप
जिल्हाधिका-यांच्या हस्ते अनाथ बालकांना प्रमाणपत्रांचे
वाटप
अकोला, दि. 3 : राज्य शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा
महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे अनाथ बालकांसाठी विशेष मोहिम राबवून, ३५ बालकांची
प्रमाणपत्रे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचे वितरण जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या
हस्ते आज झाले.
मोहिमेत जिल्ह्यातील अनाथ बालकांच्या प्राप्त माहितीवरून जिल्हा बाल
संरक्षण कक्षातर्फे त्यांच्या प्रमाणपत्रासाठी अर्जांची पूर्तता करून घेण्यात आली.
त्याच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मान्यता मिळवून ३५ बालकांची प्रमाणपत्रे
प्राप्त झाली.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या हस्ते आज १७ प्रमाणपत्रांचे वाटप
झाले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, बालकल्याण समिती सदस्य
प्रांजली जैस्वाल, बाल न्याय मंडळ सदस्य ॲड. सारिका घिरणीकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
राजू लाडूलकर, महेंद्र गणोजे, सुनील लाडूलकर, अक्षय चतरकर तसेच बालक, पालक उपस्थित
होते. उर्वरित प्रमाणपत्रांचे वाटप तहसील स्तरावर होणार आहे.
जिल्हाधिका-यांनी यावेळी बालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. अनाथांसाठी
नोकरीत एक टक्का आरक्षण असून, त्यादृष्टीने अभ्यास, तयारी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
०००
आदरणीय गिरिश पुसदकर सर खुप उत्कृष्ट अधिकारी आहेत.
उत्तर द्याहटवा