ग्रामसेवकांसाठी शुक्रवारी बालविवाह प्रतिबंध कार्यशाळा
ग्रामसेवकांसाठी शुक्रवारी बालविवाह प्रतिबंध कार्यशाळा
अकोला, दि. ९ : बालविवाह रोखण्याच्या कार्यवाहीबद्दलचे प्रशिक्षण जिल्ह्यातील
ग्रामसेवकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी महिला व बालविकास कार्यालयातर्फे कार्यशाळा
दि.११ एप्रिल रोजी नियोजनभवनात होईल.
कार्यशाळेचे दोन टप्पे असतील. अकोला,बाळापूर, पातुर व बार्शीटाकळी तालुक्यातील
ग्रामसेवकांसाठी सकाळी १० ते १२.३० या प्रथम टप्प्यात, तर अकोट, मुर्तिजापूर व तेल्हारा
तालुक्यातील ग्रामसेवकांसाठी दुस-या टप्प्यात दु. २.०० ते ४.३० या वेळेत प्रशिक्षण
होईल.
जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी कार्यशाळेत उपस्थित राहणे अनिवार्य
असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. उपस्थितीचा अनुपालन अहवाल
पंचायत समितीला सादर करावा. अधिक माहितीसाठी
सुनिल सरकटे यांच्याशी ९७६४७४८६७५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर साधावा, असे आवाहन जिल्हा
महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.
बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी
हे, तर ग्रामीण भागात ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत. ग्रामसेवकांना
या कायद्याची परिपूर्ण माहिती व्हावी यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन
यांच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा