अद्ययावतीकरणामुळे 'आपले सरकार' पोर्टलची सेवा तात्पुरती खंडित

 अद्ययावतीकरणामुळे 'आपले सरकार' पोर्टलची सेवा तात्पुरती खंडित

 

मुंबई, दि.९ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) दरम्यान ‘आपले सरकार’ पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे.

या कालावधीत ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ वरील सर्व सेवा आणि प्रणाली काही काळासाठी अनुपलब्ध राहतील.

दिनांक १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे, नागरिकांनी, आपले सरकार सेवा केंद्र/ सेतू केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, ग्रामपंचायतींनी तसेच शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी आपापल्या सेवा संबंधित कामांचे नियोजन पूर्वीच करावे, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन यांनी केले आहे.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा