बार्शिटाकळी तालुक्यात अभिलेख नाव दुरुस्ती मोहिमेला सुरुवात

 

 

बार्शिटाकळी तालुक्यात अभिलेख

नाव दुरुस्ती मोहिमेला सुरुवात

अकोला, दि.१५:  राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमात बार्शिटाकळी तहसील कार्यालयाच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रमात सातबारा अभिलेखामधील नाव दुरुस्तीची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत नावात किरकोळ चुका असलेल्या किंवा नाव बदललेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

बार्शिटाकळी तालुक्यातील सर्व गरजू शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्शीटाकळी तहसीलदार राजेश वझीरे  यांनी केले आहे. ॲग्रीस्टेक योजनेतील शेतकरी नोंदणीचा आढाव्यानुसार अनेक शेतकऱ्यांचे सातबा-यावरील नाव आधार कार्डावरील नावाशी जुळत नाही. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेणे, खरेदी-विक्री करणे अथवा आर्थिक व्यवहार करताना अडचणी निर्माण होतात. विवाहित महिलांना जुन्या व नव्या नावांतील विसंगतीमुळे विशेष अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ही मोहिम ९  एप्रिलला सुरू करण्यात आली. ती ३० एप्रिल पर्यंत बार्शिटाकळी तालुक्यातील सर्व गावांमध्ये राबवण्यात येत आहे.

ज्या शेतकऱ्यांना नावात दुरुस्ती करायची आहे, त्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी तलाठी  यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. तहसील कार्यालयाकडून अर्जाची संपूर्ण चौकशी करून आवश्यक आदेश पारित करण्यात येतील. या विशेष मोहिमेमुळे अधिकार अभिलेख अधिक स्वच्छ, अद्ययावत व अचूक होणार असून, भविष्यातील अडचणी टळणार आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा