राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतले श्री राजराजेश्वराचे दर्शन

 






अकोला, दि. ३० : राज्याचे उद्योग, आदिवासी विकास, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात दर्शन घेतले व महाआरती केली. 

यावेळी आमदार संजय खोडके, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. नाईक यांचे कलश रथयात्रेनिमित्त जिल्ह्यात आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी पातूर येथे भेट दिली. पातूर येथे शहाबाबू दर्गा व सिदाजी महाराज मंदिर येथून पवित्र मातीचे पालखीमधून रथयात्रेत आगमन झाले. त्यानंतर राज्यमंत्री नाईक यांनी अकोला येथे श्री राजराजेश्वर मंदिराला भेट दिली व दर्शन घेतले.  

यावेळी राज्यमंत्री श्री. नाईक यांच्या हस्ते महाआरती झाली. असदगड येथील माती, पवित्र नद्यांचे पाणी जलकलशात विसर्जित आले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा