सेवा हक्क दिन 28 एप्रिलला साजरा होणार लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती; जिल्हास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन

 

सेवा हक्क दिन 28 एप्रिलला साजरा होणार

लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती; जिल्हास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन

 

अकोला, दि. २३: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीचे औचित्य साधून सेवा हक्क दिन जिल्ह्यात विशेष उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

यानिमित्त दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथे कार्यक्रम होईल. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अकोला ॲड. आकाश फुंडकर, तसेच विविध मान्यवर उपस्थित राहतील. 

जिल्ह्यात ग्रामपातळीवर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांना लोकसेवा हक्क अधिनियम, राज्य सेवा हक्क आयोग आणि ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाइन सेवा यांची माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, त्याचप्रमाणे, प्रातिनिधीक स्वरूपात ५० लाभार्थ्यांना सेवा हक्क प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.

आदर्श आपले सरकार केंद्राचे उद्घाटनही यादिवशी होईल. सर्व शासकीय कार्यालये आणि ‘आपले सरकार’ केंद्रांमध्ये सेवांची व शुल्कांची माहिती देणारे क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. नागरिकांना अधिक सुलभतेने सेवा व  माहिती मिळण्यासाठी हा उपक्रम आयोजिण्यात आला आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा