अकोल्यात बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे १८० पदे भरणार
अकोल्यात बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे १८० पदे भरणार
अकोला दि. 24 : नोकरी इच्छूक उमेदवारांना खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या
संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्रातर्फे दि. ३० एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स. १० वा. प्लेसमेंट
ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
कंपन्यांनी एकूण १८० पदांची मागणी नोंदवली आहे. इक्विटस बैंक (एकुण
रिक्तपदे- २० शैक्षणीक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), स्वतंत्र मायक्रो फायनान्स
कं. (एकुण रिक्तपदे 20 शैक्षणीक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), ग्रामीण कुटा
(एकुण रिक्तपदे - ५० शैक्षणीक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), मुथूट मायक्रो फायनान्स
(एकुण रिक्तपदे -३० शैक्षणीक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), यशस्वी ग्रुप (एकुण
रिक्तपदे- ३० शैक्षणीक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), आयटीएमस्कील अॅकडमी आयसीआयसी
बँक (एकुण रिक्तपदे - ३० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर).
ऑनलाईन अर्ज दि. ३० एप्रिलपूर्वी
‘एनसीएस.जीओव्ही.इन’ या संकेतस्थळावर करावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी आपली शैक्षणिक
कागदपत्रे, बायोडाटा तसेच पासपोर्ट साईज फोटो सह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, अकोला
येथे स्वखर्चाने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. काही अडचण आल्यास, या कार्यालयाच्या
दुरध्वनी क्रमांक ०७२४२४३३८४९ किंवा ७०२४२४१०९८ / ८९८३४१९७९९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर
संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, अकोला यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा