व्यावसायिक वाहनांवरील जाहिराती आता मराठीत बंधनकारक

 

व्यावसायिक वाहनांवरील जाहिराती

आता मराठीत बंधनकारक

 

अकोला, दि. २३ : मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, राज्यात नोंदणीकृत सर्व व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांवरील सामाजिक संदेश, जाहिराती व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन मालकांना या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आवाहन केले आहे.

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा असल्यामुळे आणि बहुतांश नागरिक हे मराठी भाषिक असल्यामुळे सार्वजनिक माहिती मराठीत देणे गरजेचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लाभला आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन व सन्मान राखणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. अनेक व्यावसायिक वाहनांवर हिंदी अथवा अन्य भाषांतील जाहिरातींमुळे मराठीच्या प्रचार व प्रसारावर मर्यादा येतात.  त्यामुळे जाहिराती, तसेच प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहून मराठीचा योग्य सन्मान राखला जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा