अनुसूचित जातीतील युवकांसाठी उपक्रम कपडेनिर्मितीबाबत विनामूल्य प्रशिक्षण

 

 

अनुसूचित जातीतील युवकांसाठी उपक्रम

कपडेनिर्मितीबाबत विनामूल्य प्रशिक्षण

अकोला, दि. २३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील बेरोजगार युवक, युवती आणि महिलांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत (एमसीईडी) वस्त्रनिर्मिती विनामूल्य प्रशिक्षण घेण्यात येत आहे.  

हे ४५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण असेल. अमरावती येथील कस्तुरबा सौर खादी क्लस्टर परिसरात दि. २९ एप्रिल ते १४ जून २०२५ प्रशिक्षण होईल. या प्रशिक्षणात ४० पात्र लाभार्थ्यांची निवड होणार आहे. त्याद्वारे वस्त्रोद्योगातील सर्वसमावेशक तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात कापसापासून दोरा व कापड निर्मिती, त्यानंतर तयार कपडे निर्मितीचे  प्रात्यक्षिक, तसेच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, शासकीय योजनांची माहिती, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबी तज्ज्ञांकडून शिकविल्या जाणार आहेत.

 

प्रशिक्षणादरम्यान चहा, नाश्ता, भोजन व निवासाची विनामूल्य सोय करण्यात येणार आहे.

सहभागासाठी १८ ते ५० वर्षे या वयोमर्यादेतील किमान १० वी उत्तीर्ण किंवा आयटीआय उत्तीर्णांना प्रवेश मिळेल. महिलाभगिनींना प्राधान्य असेल. अर्जदार बँकेचा थकबाकीदार नसावा. प्रशिक्षणाच्या कालावधीत अमरावती येथे ४५ दिवस उपस्थित राहण्याची तयारी असावी.

इच्छूकांनी दि. २५ एप्रिलपर्यंत दुर्गा चौक परिसरातील शुक्ल सदन इमारतीतील जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ८६००८०७००१ यांच्याशी संपर्क साधावा. संधीचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकसंतोष बनसोड, प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा