राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज मागविले

 

राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज मागविले

अकोला, दि. ८ : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोगट ५ ते १८ वर्षांदरम्यान शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रांत विशेष नैपुण्य दर्शविणा-या बालकांना हा पुरस्कार दिला जातो. ऑनलाईन अर्ज ‘अवॉर्ड.जीओव्ही.इन’ https://awards.gov.in या संकेतस्थळावर स्वीकारले जातील.

दि. ३१ जुलै २०२५ रोजी पाच वर्षांहून अधिक व १८ वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांसाठी अर्ज करता येईल. अर्ज मुले किंवा त्यांच्या वतीने पालक, सामाजिक कार्यकर्ता किंवा राज्य सरकार, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायतराज संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आदी अर्ज करू शकतात, असे महिला व बालविकास विभागातर्फे सांगण्यात आले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम