वन्यप्राणी पीक नुकसानभरपाईसाठी मोबाईल ॲप

 

वन्यप्राणी पीक नुकसानभरपाईसाठी मोबाईल ॲप

अकोला, दि. २५ : वन्यप्राण्यांकडून पीकांचे नुकसान झाल्यास  शेतकरी बांधवांना नुकसानभरपाईचा लाभ विहित वेळेत मिळण्यासाठी वन विभागाने ‘महा वन्यजीव भरपाई’ (Maha Vanya-Jeev Bharapai) हे मोबाईल अॅप विकसित केले आहे.

 

जिल्ह्यात वन्यप्राणी रोही, रानडुक्कर व काळवीट यांची संख्या वाढली आहे. त्यांचा वावर वाढल्याने पीक नुकसानी होते.  शेतात वन्यप्राण्यांनी पीक नुकसानी केल्यास शेतकरी महाफॉरेस्ट (https.//mahaforest.gov.in) या संकेतस्थळावर नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. अर्जाच्या छाननीनंतर शासन निर्णयानुसार व नियमानुसार वन्यप्राण्यांनी केलेल्या पिक नुकसानीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येते. त्याचप्रमाणे, महा वन्यजीव भरपाई या ॲपद्वारेही नुकसान भरपाईसाठी अर्ज करता येतो, अशी माहिती वन विभागातर्फे देण्यात आली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना