अंत्योदय कुटुंबांना साडी वितरणाचे काम लवकरच पूर्ण होणार

 अंत्योदय कुटुंबांना साडी वितरणाचे

काम लवकरच पूर्ण होणार

- जिल्हा पुरवठा अधिकारी

अकोला, दि. १५ : अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला कॅप्टिव्ह मार्केट योजनेत प्रतिकुटुंब एक साडी दरवर्षी देण्याची तरतूद आहे. या साड्यांचे वितरण सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल.कुणीही पात्र व्यक्ती या लाभापासून वंचित राहणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.

 

राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी प्रतिकुटुंब एक साडी विनामूल्य वितरित करण्यासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील तालुकानिहाय मागणी लक्षात घेऊन ४५ हजार ६६४ साड्यांची मागणी नोंदविण्यात आली. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून शासकीय धान्य गोदामात मार्च महिन्यात साड्या प्राप्त झाल्या. एप्रिल महिन्याच्या धान्य वितरणासोबत साडीवितरण सुरू करण्यात आले. मार्च महिन्यात २० तारखेपर्यंत सर्व रास्तभाव दुकानात साडी पोहोचविण्यात आली.

साडी वितरण ई-पॉसद्वारे ऑनलाईन असल्याने मार्च महिन्यात ४५ हजार ६६४ शिधापत्रिकाधारकांपैकी २४ हजार ८९४ शिधापत्रिकाधारकांना साड्या वितरित करण्यात आल्या आहेत. उर्वरित २० हजार ७७० साडी वितरण एप्रिल महिन्यात सुरू असून, ते लवकर पूर्ण करण्यात येईल. कोणतीही पात्र शिधापत्रिकाधारक महिलाभगिनी साडी वितरणापासून वंचित राहणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिका-यांनी सांगितले.

०००  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा