भूमीअभिलेख उपअधीक्षक कार्यालयात भू-प्रणाम केंद्रांचा शुभारंभ जलद, सुलभ सेवा




 

भूमीअभिलेख उपअधीक्षक कार्यालयात

भू-प्रणाम केंद्रांचा शुभारंभ

जलद, सुलभ सेवा

अकोला, दि. ४ :  राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार राज्यातील ३० उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयांच्या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी अद्ययावत सोयींसह भू-प्रणाम केंद्र स्थापित करण्यात आले. त्यात अकोल्याचा समावेश असून, येथील  केंद्राचे व्हर्च्युअल उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षक भारती खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात भू प्रणाम केंद्र कार्यरत राहणार आहे. यावेळी भूमी अभिलेख उपअधीक्षक पंकज पवार यांच्यासह कार्यालयाचे कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते

 

नागरिकांच्या सेवेसाठी केंद्रात सेतू सेवा केंद्रही कार्यान्वित करण्यात आले असून, नागरिकांना भूमी अभिलेखविषयक सर्व प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० कार्यालये निवडण्यात आली. त्यात अकोला कार्यालयाचा समावेश आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी स्वागत कक्ष, अभ्यागत कक्ष, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही, सूचनाफलक, फर्निचर, संगणक आदी सुविधा आहेत. नागरिकांना आवश्यक माहितीसाठी विविध फलक लावण्यात आले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम