फळपीक विमा योजनेसाठी ई-पीक पाहणी बंधनकारक शेतक-यांना कृषी विभागाचे आवाहन

 

फळपीक विमा योजनेसाठी

ई-पीक पाहणी बंधनकारक

शेतक-यांना कृषी विभागाचे आवाहन

अकोला द‍ि. 9 : पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.

फळपिकांचा विमा घेतलेल्या तथापि, अद्यापही ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे पूर्ण न केलेल्या सर्व संबंधित शेतक-यांनी दि. २५ एप्रिलपूर्वी ई- पिक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले.

सातबारा उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येणार आहेत व त्यांना फळपीक विम्याचा लाभ दिला मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पुनर्रचित हवामानाधारित फळ पीक विमा योजना राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी व युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी आदी विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे. मृग बहार २०२४मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, चिकू, पेरू, सिताफळ व लिंबू या आठ फळपिकांसाठी २६ जिल्ह्यांमध्ये, तर आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यांमध्ये फळपिकांना हवामान धोक्यांच्या निकषानुसार योजना राबविण्यात येत आहे.

      ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम