उन्हामुळे शाळेच्या वेळेत बदल जिल्हाधिका-यांचे आदेश
उन्हामुळे शाळेच्या वेळेत बदल
जिल्हाधिका-यांचे आदेश
अकोला, दि. ११ : जिल्ह्यात
मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झालेली आहे. शालेय विद्यार्थ्यांना
उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी
अजित कुंभार यांनी निर्गमित केले आहेत.
मागील आठवड्यात जिल्ह्यातील तापमानाची नोंद 44 अं. से. पर्यंत झाली
आहे. तापमानाचा पारा चढता असल्यामुळे उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे
उष्माघाताचा धोका निर्माण झाला असुन, त्याचा त्रास शालेय विद्यार्थ्यांना होऊ नये,
यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची वेळ सकाळच्या
सत्रात- प्राथमिक शाळांसाठी सकाळी 07 ते 11.15 व माध्यमिक शाळांसाठी 7.00 ते 11.45 अशी
निश्चित करावी, असे आदेशित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासुन बचाव करण्यासाठी माहिती द्यावी.
विद्यार्थ्यांच्या मैदानी, शारिरीक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानामध्ये वर्ग घेऊ
नये. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याबाबत खात्री करावी. विद्यार्थ्याकरिता स्वच्छ
पाणी उपलब्ध असावे. त्यांना पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे परिधान
करण्याची मुभा देण्यात यावी. टोपी किंवा इतर
पारंपरिक साधनांचा वापर करण्याबाबत सुचना द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा