जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता अर्ज आमंत्रित; 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

अकोला , दि. 31 ( जिमाका)- जवाहर नवोदय विद्यालय, बाभूळगाव(जहाँ) अकोला येथे शैक्षणिक सत्राकरीता इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून या निवड चाचणी परिक्षेचे आवेदन पत्राकरीता बुधवार दि. 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर इच्छुक विद्यार्थी व पालकांनी विहीत मुदतीत अर्ज करावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे. 000000