कोविडः आरटीपीसीआरमध्ये एक पॉझिटीव्ह तर एकाचा मृत्यू ; रॅपिड ॲटिजेन चाचणी अहवाल ‘निरंक’,एक रुग्ण ओमीक्रॉन पॉझिटिव्ह

अकोला दि.26(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 145 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉ‍झिटीव्ह आला, तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे अकोला येथे दि. 18 रोजी दाखल झालेल्या एका कोरोना बाधीत महिलेचा ओमिक्रॉन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.

काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57909(43297+14435+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य  = एकूण पॉझिटीव्ह एक.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 342609 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 338953 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3254 नमुने होते. आजपर्यंत एकूण 342609 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 299312 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.  

एक पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात एका पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून तो अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

एका रुग्णाचा अहवाल ओमीक्रॉन पॉझिटिव्ह

 दरम्यान अकोला येथे दि. 18 रोजी दाखल झालेल्या एका कोरोना बाधीत महिलेचा ओमिक्रॉन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे. ही महिला दुबई येथून प्रवास करून आली होती. सद्यस्थितीत ह्या रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

एकाचा मृत्यू

दरम्यान काल एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण 60 वर्षीय पुरुष असून रोहणा, दहिहांडा येथील रहिवासी आहे. त्याना दि. 18 डिसेंबर  रोजी रुग्णालयात दाखल केले होते,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सहा जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57909(43297+14435+177) आहे. त्यात 1142  मृत झाले आहेत. तर 56761 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत सहा जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 192 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.25) दिवसभरात झालेल्या 192 चाचण्या झाल्या त्यात एकाचा  अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. 

       काल दिवसभरात अकोट येथे 10, अकोला महानगरपालिका येथे 130, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 29, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 21, तर हेगडेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 192 चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ