डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजनेचे अर्ज 31 डिसेंबरपर्यंत करा

 अकोला दि.24 (जिमाका)- अकोला जिल्ह्यांच्या ठिकाणी तसेच महानगरपालिका हद्दीपासून पाच कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालय व शैक्षणिक संस्थेत अनुसुचित जाती तथा नवबौध्‍द घटकांतील मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात प्रवेशीत तथा प्रवेश न केलेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजनेचे अर्ज समाजकल्‍याण कार्यालयाच्‍या अधिनस्‍त असलेल्‍या शासकीय वसतीगृहात शुक्रवार दि. 31 डिसेंबरपर्यंत करावे, असे आवाहन समाजकल्‍याणचे सहायक आयुक्‍त  डॉ. अनिता राठोड यानी केले.

समाज कल्‍याण कार्यालयाच्‍या अधिनस्‍त असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला,  गुणवंत  मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला, मागासवगीय मुलींचे शासकीय वसतिगृह, संतोषी माता मंदिराजवळ अकोला मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मित्र नगर अकोला येथे अर्ज  करावे. महाविद्यालय व शैक्षणिक संस्‍थेत शिक्षण घेत असलेल्‍या मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेल्‍या तथा शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्‍या विद्यार्थ्यांपैकी अनुसुचित जाती तथा नवबौघ्‍द घटकांतील इयत्ता अकरावी, बारावी तसेच बारावी नंतरच्‍या व्‍यावसायीक अभ्‍यासक्रमांमध्‍ये सन 2020-21 व 2021-22 कालावधीकरीता प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्‍ध होणार आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ